Ad will apear here
Next
बाँबे रोझ : उत्कट भावस्वप्न मांडणारा अॅनिमेशनपट


अल्फाज जो उगते, मुरझाते, जलते, बुझते
रहते है मेरे चारों तरफ
अल्फाज जो मेरे गिर्द पतंगों की सूरत उडते
रहते है रात आौर दिन
इन लफ्जों के किरदार है, इनकी शक्ले हैं
रंग रुप भी है आौर उम्रें भी..

‘मुंबई’ या गुलजारच्या कवितेतल्या ओळींसारख्या ‘बाँबे रोझ’ या (नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेल्या) अॅनिमेशनपटातल्या व्यक्तिरेखा प्रत्येक फ्रेममध्ये रंगांच्या छटा आणि भावच्छटा घेऊन साकार होत जातात. आपापले रंग, रूप, हावभाव, स्वभाव, भावना, स्वप्नं, इच्छा, आकांक्षा घेऊन आपल्याभोवती त्या रुंजी घालतात. गीतांजली राव हिनं या अॅनिमेशनपटातून एक भावस्वप्न आपल्यासमोर खूप उत्कटपणे आणलं आहे. 



प्रेम, कारुण्य, अनुकंपा, साहचर्य, त्याग, आश्चर्य, आनंद, अभिमान, उत्साह, कुतूहल, राग, द्वेष, मत्सर, खुनशीपणा, स्पर्धा, हेवेदावे आणि एकटेपणा, एकाकीपणा, निराश, हताश, विषण्णता, उदासीनता, शोकमग्नता अशा असंख्य भावना तितक्याच उत्कटपणे रंगांमधून विलक्षण प्रभावीपणे या चित्रपटात समोर येत राहतात. हा चित्रपट आपल्या मानसिकतेला आनंदापासून नॉस्टॅल्जियापर्यंत आणि आश्वर्यापासून पापणीत अडकलेल्या अश्रूंपर्यंतचा प्रवास घडवतो. 



मनातल्या तरल, हळव्या कानाकोपऱ्यांमध्ये लपलेल्या शहराच्या, गतकालाच्या, आयुष्यात असलेल्या आणि काळाच्या ओघात दुरावलेल्या माणसांच्या कहाण्या या चित्रपटात दिसतात. त्या आपल्याला भावतात. याचं कारण त्या प्रत्येक फ्रेममागे, घटनेमागे आपल्या आयुष्यातल्या लाखो आठवणी, प्रसंग, माणसं, पाहिलेली ठिकाणं, अनुभवलेले, मंतरलेले, मंत्रमुग्ध करणारे आणि एकाकी करणारे अनेक क्षण आपल्याला आठवत राहतात. प्रत्येक प्रेक्षकाच्या मनातल्या कोणत्या ना कोणत्या कप्प्याला आणि कोपऱ्याला हा अॅनिमेशनपट हात घालतो. चांगल्या कलाकृती हेच करतात. नाही का?

- नीलांबरी जोशी


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CUFVCW
Similar Posts
उत्खनन १९३९च्या मे महिन्यात उत्खनन करणारा बेसिल ब्राउन एडिथ प्रिटी या महिलेच्या ‘सफोक’ या इंग्लंडमधल्या परगण्यात खोदकाम करायला हजर होतो. पुरातत्त्वशास्त्रातलं आजतागायत अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलेलं एक उत्खनन तो करतो. ‘द डिग’ या नेटफ्लिक्सवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची ही मध्यवर्ती संकल्पना. हा चित्रपट
‘पेले’ डॉक्युमेंटरी : ब्राझीलमधल्या एका कालपटाचा इतिहास ‘तो देशाचा विजय होता. तो (फुटबॉल या) खेळाचा विजय नव्हता...’ ‘पेले’ या नेटफ्लिक्सवरच्या डॉक्युमेंटरीमध्ये १३६३ गेम्समध्ये १२७९ गोल करणारा पेले स्वत: हे शेवटचं वाक्य म्हणतो. यामागचे संदर्भ ती डॉक्युमेंटरी पाहताना कळत जातात.
असा प्रीतीचा नाद अनाहत..! चित्रपटाच्या शेवटी ‘पण हे सगळं करून तू आनंदात राहशील का’ या जेरीच्या प्रश्नावर शार्लोट म्हणते, ‘आपल्या दोघांनाच जाणवणारा आपल्यातल्या प्रेमाचा तो मंतरलेला प्रदेश आपल्यात जिवंत असताना, प्रेमाचा अनाहत नाद आपल्याला ऐकू येत असताना, फक्त आपल्या नजरेला दिसणारा चांदण्यांचा झिलमिलता प्रकाश समोर असताना आपण चंद्राची
वाटांसवें त्या पळालों सारें काहीं झुगारून...! अन्न, वस्त्र, निवारा या मूळ गरजा भागवणारा मानव उत्क्रांत होत गेला तशा दया, करुणा अशा उन्नत समजल्या जाणाऱ्या सकारात्मक भावना त्याच्यात रुजत/दृढ होत गेल्या. तसं इस्टवूडनं सुरुवातीच्या चित्रपटात गुन्हेगार, मग इन्स्पेक्टर आणि नंतर मानसिक गुंतागुंत जाणणारा, दया, करुणा, प्रेम आणि मदतीचा हात पुढे करणारा नायक रंगवला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language